
वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुशील हगवणे आणि त्याचे वडील राजेंद्र हगवणे यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सुशील हगवणे घोड्यावर बसून दादागिरीच्या थाटात बोलताना दिसतो. तो म्हणतो, “माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय, तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा!” यावेळी त्याचे वडील राजेंद्र हगवणे देखील त्याच्यासोबत उपस्थित आहेत.