
Pune Crime News: उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय असलेले मुळशी तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने चारित्र्याच्या संयशावरून तसेच हुंड्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्यासारखं टोकाचा पाऊल उचललं. परंतु गळा दाबल्याने तिचा जीव गेल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमधून पुढे आलंय. वैष्णवीनंतर तिचा दहा महिन्यांचा मुलगा नेमका कुठे आहे, याबाबत काहीच माहिती समोर आली नाही. मात्र आता वैष्णवीच्या मुलाला गायब केल्याचं तिच्या माहेरच्यांचं म्हणण आहे.