परिचारिका ते मृतदेहांवर अंत्यसंस्कार; धाडसी वैष्णवीची निस्वार्थ सेवा

इंटेरिअर डिजाईनर असलेली वैष्णवी करतेय कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार
परिचारिका ते मृतदेहांवर अंत्यसंस्कार; धाडसी वैष्णवीची निस्वार्थ सेवा
Updated on

स्वारगेट : कोरोना काळात वैकुंठ स्मशानभूमीत जायचं सुद्धा धाडस होत नाही तिथे परक्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम पुण्यातील 23 वर्षीय तरुणी धाडसाने करत आहे. मृतदेहांच्या चितेची राख साफ करणे, प्रत्यक्ष सरण रचणे, मृतदेह उचलणे ते रचलेल्या चितेवर ठेवणे, गोवऱ्या लावणे आणि दहन पूर्ण होण्यापर्यंत त्याची निगराणी करणे अश्या साऱ्या जबाबदाऱ्या सावित्रीची लेक वैष्णवी राठी पार पाडत आहे. (Vaishnavi Rathi Interior Designer from Pune helping for Cremation on the corpses of Corona positive)

नाही नाही म्हणता कोविडची दुसरी लाट येऊन धडकलीच. या लाटेला थोपविण्यासाठीची आपली तयारी निश्चितच कमी पडली. थोड्या फार फरकाने मागे होती तशीच स्थिती परत समोर येऊन ठेपली. मागील वर्षाप्रमाणे यंदाही धान्य, औषध, उपचार इत्यादींची टंचाईही भेडसावू लागली. अनेक कार्यकर्ते व संस्था या स्थितीशी सामना करण्यासाठी पुढे सरसावले. महत्वाचे म्हणजे ही मंडळी शासनाकडून नेमलेली नव्हती तर आपत्तीच्या काळात त्यांना स्वस्थ बसणे जमेना, म्हणून सेवा भावनेने पुढं आलेली होती.

अशा शेकडो कार्यकर्त्यात एक असलेली वैष्णवी. व्यवसायाने इंटेरिअर डिजाईनर. वैष्णवीने मागील वर्षी गरवारे कॉलेजच्या कोविड सेंटरला परिचारिका म्हणून सात दिवस सेवा कार्य केले होते. यंदा ही ती वंचितांना फूड पेकेट वाटण्याच्या काम जबाबदारीने करत होती. कोरोनामूळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची हेळसांड होऊ नये म्हणून स्वरूपवर्धिनिच्यावतीने यंत्रणा उभारण्यात येत असल्याचे तिला कळाले. त्यासाठी कार्यकर्त्यांची आवश्यकता असल्याचेही समजले. तिने ही आपले नाव या कामासाठी नोंदविले.

परिचारिका ते मृतदेहांवर अंत्यसंस्कार; धाडसी वैष्णवीची निस्वार्थ सेवा
गरज १२००, पुरवठा १००;म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनची शहरात स्थिती

स्त्री सर्व क्षेत्रात पुढे येत असली तरी स्मशानभूमीत तिने काम करावे हे अजून तरी पचनी पडणारं नसावं. त्यात माहेश्वरी समाजात आजही स्त्रियांना स्मशानभूमीत जाण्यास मान्यता नाही. अश्यात तिचे या कामास तयार होणे थोडे धाडसाचे ठरणार होते; पण आई वडिलांनी तिला हसतमुख परवानगी दिल्याने वैष्णवी वैकुंठ येथे रुजू झाली. अनेक ठिकाणी आपल्या जवळच्या व्यक्तींचे मृतदेह हाताळायला जिथे भल्या भल्यांचे हात थरथरतात, तिथं परक्या, अजाण, कोरोनाग्रस्त लोकांच्या शवांवर दाहसंस्कार करण्यासाठी एक वेगळे धारिष्ट्य लागते. चितेची राख साफ करणे, प्रत्यक्ष सरण रचणे, मृतदेह उचलणे, ते रचलेल्या चितेवर ठेवणे, गोवऱ्या लावणे आणि दहन पूर्ण होण्यापर्यंत त्याची निगराणी करणे अश्या साऱ्या जबाबदाऱ्या वैष्णवीने पार पाडल्या. मृतदेहाला भडाग्नी देण्याआधी ती संस्थेची ठरवलेली प्रार्थनेत ही सामील होते. तसेच मृतांच्या नातेवाईकांना धीर देणे, त्यांच्यासाठी बसण्याची, पाण्याची व्यवस्था करणे, अस्थी गोळा करून देणे ही सारी कामं ही करण्यातही ती अग्रेसर होती.

''खरं तर समाजाच्या हाकेला 'ओ' देण्यासारखे समाधान नाही. त्यात तरुण वयात मोबाईल, लॅपटॅाप, सोशल मीडिया, मनोरंजन, गल्लेलट्ठ पगाराची नोकरी, व्यतिरिक्त ही वेगळं असे जग आहे आणि त्या जगाचं आपण ही काही देणं लागतो म्हणूनच स्त्री या नावाखाली घरात बसणे मला बरोबर वाटत नाही'' अशी भावना वैष्णवी राठी हिने 'सकाळ'सोबत बोलताना व्यक्त केली.

परिचारिका ते मृतदेहांवर अंत्यसंस्कार; धाडसी वैष्णवीची निस्वार्थ सेवा
‘जम्बो’त महिला डॉक्टर अव्वल; कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com