'इथं' नाही एकही कोरोनाबाधित रुग्ण...

Shikrapur_Pune
Shikrapur_Pune

शिक्रापूर : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या आदर्शग्राम वाजेवाडीत अद्याप एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याने हे संपूर्ण श्रेय बापट यांचेच असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. पाच वर्षात ’व्हिलेज से स्मार्ट व्हिलेज’ करणाऱ्या बापटांची ऐन कोरोनाकाळात वाजेवाडीची भेट निश्चित झाली असून, पाच वर्षांत तीन कोटींच्या विकासकामांनी संपन्न वाजेवाडीला परिपूर्ण वाजेवाडी करण्यासाठी ग्रामस्थांचा प्रयत्न असल्याची भूमिका ग्रामस्थांनी मांडली.

पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात पुणे जिल्ह्यातील एकमेव गाव दत्तक घेण्याचे काम गिरीश बापट यांनी सन २०१६ मध्ये केले. त्यानंतर गावात तब्बल सात कोटींचा निधी गावाला दिला. यात पाच एकरमधील भव्य गावतळ्याचे १० फुट खोलीकरण, गावांतर्गत सर्व १० रस्त्यांचे नूतनीकरण, स्मार्ट स्मशानभूमी, ड्रेनेज-लाईन, वाचनालय, सौरदिवे, स्ट्रीटलाईट, हायमास्ट दिवे, ४० एकर गायरानात ३ हजार झाडांचे वृक्षारोपन, ओपन तसेच बंदिस्त जीम, अंगणवाडी खेळणी-बाकडी व अंतर्गत सजावट, ग्रामसुरक्षेसाठी गाव सीसीटिव्ही योजना, गावांतर्गत सर्व रस्त्यांवर कॉंक्रीटीकरण व पेवींग ब्लॉक तसेच देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भोंडवेवस्ती व मांजरेवाडीसाठी एक सलग पक्के डांबरीकरणाचे रस्ते. एवढी कामे केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पर्यायाने वाजेवाडी स्वयंपूर्ण-ग्राम म्हणून गावचा चेहरा बदलण्याचे काम बापट यांनी केल्याने ग्रामपंचायत सार्वजनिक स्वच्छतेच्या-आरोग्याच्या विविध उपाययोजना राबवित असल्याने वाजेवाडी कोरोनापासून गावचा बचाव झाला असून, याचे संपूर्ण श्रेय बापट यांचेच असल्याचे मत ग्रामस्थांचे वतीने सरपंच मोहन वाजे यांनी व्यक्त केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, सध्याच्या कोरोनाच्या गंभीर स्थितीतही गिरीश बापट हे वाजेवाडीकरांच्या सतत संपर्कात असून, गावच्या एकूणच आरोग्य स्थितीबाबत ते सतत चौकशी करीत असतात. ते गावकऱ्यांच्या आग्रहाखातर लवकरच गावभेटीसाठी येणार असल्याचे उपसरपंच देवा भोर यांनी सांगितले. 

होय...! बापटसाहेबांमुळेच आम्ही संपन्न वाजेवाडीकर झालोय : अमित सोनवणे

वाजेवाडी दत्तक घेण्याचा योगायोग होण्याचे निमित्त मी झालो आणि वाजेवाडी आदर्श झाली. बापटसाहेबांमुळे गेल्या पाच वर्षात सात कोटींची विकास कामे होवू शकली आणि त्याचा परिणाम सध्या कोरोनामुक्त वाजेवाडी म्हणून आम्ही जिल्ह्यात ताठ मानेने मिरवतोय याचा अभिमान वाटतोय. 

(Edited By : Krupadan Awale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com