
मंचर : आंबेगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 900 च्या जवळ पोचली आहे. कोरोनाचा संसर्ग व मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनाने जनजागृती बरोबरच तळेघर, घोडेगाव व मंचर येथे कोविड उपचार केंद्र व बेडची संख्या वाढवावी. रॅपिड अँटिजन टेस्ट किटचा स्टॉक ठेवावा, खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी. मंचर उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयामध्ये एमबीबीएस डॉक्टरच्या जागा त्वरित भराव्यात, असा आदेश राज्याचे कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला.
मंचर येथे कोरोना आढावा बैठकीत वळसे पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, प्रांत अधिकारी सारंग कोडलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, तहसीलदार रमा जोशी, कार्यकारी अभियंता बी. एन. बहिर उपस्थित होते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वळसे पाटील म्हणाले, ""मंचर उपजिल्हा रुग्णालयात 100 बेडचे कोविड उपचार केंद्र सुरू झाल्यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून बाळंतपण व सीझर महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत खासगी गेटवेल हॉस्पिटलमध्ये मोफत व्यवस्था करावी. इतर आजाराच्या रुग्णांची गैरसोय होणार नाही. याची काळजी घ्यावी.'' प्रसाद, डॉ. सीमा देशमुख, डॉ. चंदाराणी पाटील, डॉ. सुरेश ढेकळे यांनी चर्चेत भाग घेतला.
कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी होण्यासाठी डॉ. तात्याराव लहाने व डॉ. ओक हे डॉक्टरांना ट्रेनिंग देणार आहेत. जिल्ह्यात रुग्णांच्या तपासणीचे काम, ऑक्सिजन बेडची संख्या वाढविली आहे. रेमडेस्वीर इंजेक्शन मंचर येथे मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होईल. कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे. पोलिस व प्रशासनाने नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.