

नवनाथ भेके
निरगुडसर : सुमारे ४० वर्षांपूर्वी वळती-शिंगवे रस्त्यावर बांधण्यात आलेला वळती-मांगीरबाबा हा ओढ्यावरील पूल अत्यंत जीर्ण व धोकादायक बनला आहे.संबधित कामाची निविदा निघून अडीच महिने झाले,सार्वजनिक बांधकाम विभागाने आदेश देऊन देखील ठेकेदार काम करेना,या पुलावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे मात्र प्रशासनाच्या आदेशानंतरही या पुलावरून वाहतूक सुरूच असल्याने मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे.