Pune News: वनदेवी टेकडीवरील आगीत नव्याने लावलेली झाडे होरपळली; वृक्षसंवर्धनाच्या प्रयत्नांना फटका

Van Devi Hill Fire : कर्वेनगर येथील वनदेवी टेकडीवर फटाक्यांच्या आतषबाजीमुळे लागलेल्या आगीत मोठी झाडे आणि नव्याने लावलेली रोपे होरपळली.
Fire scorches trees and newly planted saplings at Van Devi Hill in Karvenagar.

Fire scorches trees and newly planted saplings at Van Devi Hill in Karvenagar.

esakal

Updated on: 

कर्वेनगर: कर्वेनगर येथील वनदेवी टेकडीवर काल फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वाळलेल्या गवताला आग लागली. या आगीत मोठ्या झाडांसह नव्याने लावलेली कित्येक रोपेही होरपळली. गेल्या अनेक वर्षांपासून विविध संस्था आणि स्थानिक नागरिकांकडून या टेकडीवर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे काम सुरू आहे. मात्र, या आगीमुळे त्यांच्या प्रयत्नांना मोठा फटका बसला आहे.

Loading content, please wait...