

पुणे: वनराज आंदेकर हत्या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. काल शहराच्या मध्यभागी वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली, आणि या हत्येच्या आरोपांमध्ये आता त्याच्या बहिणी आणि जावयाचे नाव समोर आले आहे. वनराज आंदेकरच्या वडिलांनी हा गंभीर आरोप करत दावा केला आहे की, या हत्येच्या कटात त्याच्या बहिणी आणि जावयाचा हात आहे. १३ जणांच्या टोळक्याने ही हत्या केली असून या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
वनराज आंदेकर याच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, त्यांच्याच दोन मुलींनी आणि दोन जावयांच्या सांगण्यावरून हे कृत्य केलं आहे. आत्तापर्यंत १० आरोपी निष्पन्न झाले असून ४ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादावरून हा खून करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
वनराज आंदेकर हे पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते निवडून आले होते. त्यांच्या आधी त्यांच्या आई राजश्री आंदेकर आणि चुलत भाऊ उदयकांत आंदेकर हे देखील नगरसेवक होते. वत्सला आंदेकर, वनराज यांच्या कुंटुबातील एक महिला, पुणे शहराच्या महापौर म्हणूनही कार्यरत होत्या. आंदेकर कुटुंबाचा पुण्यातील राजकारणात आणि गुन्हेगारी विश्वात मोठा प्रभाव आहे.
वनराज आंदेकर याचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांना गँगस्टर प्रमोद मालवडकर यांच्या हत्येप्रकरणी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, आणि मारहाण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच, बंडू आंदेकर यांच्यासह अन्य सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते, त्यांना या प्रकरणात जामीन मिळाला.
पुणे पोलिसांनी या प्रकरणात सखोल तपास सुरु केला आहे. आत्तापर्यंत २ जणांना अटक केली असून, त्यांच्या मृतदेहाचे शवविचेदन सध्या सुरू आहे. पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले की, "आम्ही या प्रकरणाचा सर्वांगीण तपास करत आहोत आणि लवकरच दोषींना शिक्षा मिळेल याची खात्री आहे."
या प्रकरणामुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे आणि दोषींना कठोर शिक्षा होईल याची ग्वाही दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.