खंडाळा - वरद ढगे ची  इन्स्पायर मानक अवॉर्ड साठी निवड

खंडाळा - वरद ढगे ची इन्स्पायर मानक अवॉर्ड साठी निवड

Published on

इन्‍स्‍पायर अवाॅर्डसाठी
वरद ढगेची निवड

खंडाळा, ता. १६ : असवली येथील संत शिक्षण संस्थेच्‍या पूज्य बापूजी साळुंखे विद्यालयातील इयत्ता आठवीचा विद्यार्थी वरद लक्ष्मण ढगे याची इन्स्पायर मानक अवॉर्डसाठी निवड झाली आहे. वरद ढगे याने विज्ञान विषयातील अभिनव संकल्पनेवर आधारित प्रकल्प तयार केला आहे. त्याच्या कल्पकतेची व वैज्ञानिक दृष्टिकोनाची दखल घेत या शैक्षणिक वर्षासाठी त्याच्या प्रकल्पाची निवड करण्यात आली. या यशासाठी विज्ञान शिक्षक विकास काकडे यांचे मार्गदर्शन तसेच वैशाली पाटील, दिलीप गावीत, प्रतीक्षा पवार, कल्याणी रांजणे यांचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय गुरव, वर्गशिक्षक हनुमंत कनप, सर्व शिक्षकवृंद तसेच संत शिक्षण संस्थेच्‍या पदाधिकाऱ्यांनी वरदचे अभिनंदन केले.
----------------------------
फाेटाे :...........06062
वरद ढगे
...................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com