वरकुटे येथील बंधा-याचा स्लॅब उखडू लागला, तात्काळ दुरूस्तीची मागणी

वरकुटे येथील बंधा-याचा स्लॅब उखडू लागला, तात्काळ दुरूस्तीची मागणी

Published on

स्लॅब उखडल्याने वरकुटे बंधाऱ्याची दुरवस्था

दुरुस्तीची मागणी; ठेकेदाराने काम दर्जाहीन केल्याचा ग्रामस्थांचा आरोप

म्हसवड, ता. ३ : जिहे- कठापूर उपसा सिंचन योजनेंतर्गत वरकुटे (ता. माण) येथील माणगंगा नदीवरील काटकरवस्ती नजीकच्या कोल्हापूर पद्धतीचा सिमेंट काँक्रिटच्या बंधाऱ्याचा स्लॅब उखडू लागला असून, तत्काळ त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत या बंधाऱ्याचे काम करण्यात आले आहे. माण नदीवरील सर्वात शेवटी काम झालेला हा बंधारा आहे. याचे काम दहा वर्षांत अनेक टप्प्यांत करण्यात आले. दोन वेळा ठेकेदारही बदलले गेले. त्यामुळे या बंधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ट झाले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
काम झाल्यानंतर त्यामध्ये आतापर्यंत दोन वेळा पाणी साठवण्यात आले आहे; पण बंधाऱ्यावरील भागात ग्रीलचे काम पूर्ण करण्यात आले नव्हते. त्यामुळे पाणी भरलेले असताना त्यावरून जाणे- येणे म्हणजे तारेवरची कसरत होत आहे. बंधाऱ्याच्या कामासाठी तत्कालीन अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठेकेदाराने कमी प्रतीचे साहित्य वापरून दर्जाहीन काम केल्याचा आरोप केला आहे.
बंधाऱ्यावरील स्लॅब उखडू लागला आहे. उभ्या पिलरवरील सिमेंटही निघून लागले आहे. जमीन व बंधाऱ्यादरम्यान संरक्षक भिंतीवरील सिमेंटही निघू लागले आहे. लोखंडी ग्रीलसाठीचे अँगल निघाले असल्याने दुरवस्था झाली आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने बंधाऱ्याची पाहणी करून त्याची डागडुजी करावी, ग्रील पुन्हा उभे करावे, तसेच पिलरवरील निघालेले सिमेंट पुन्हा लावावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

----------------------------

02395
वरकुटे : येथील नदीपात्रातील सिमेंट काँक्रिट बंधाऱ्याची झालेली दुरवस्था.

---------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com