बारामतीत विविध संघटनांकडून 'मदतीचा हात'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 April 2020

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विविध संघटना व सेवाभावी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. 

बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विविध संघटना व सेवाभावी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. येथील श्री जैन श्वेतांबर संघाच्या वतीने 29 मार्चपासून दररोज दोन वेळचे जेवण गरजूंना पुरविले जात आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार संघाचे कार्यकर्ते जागेवर किंवा लोक असतील तेथे जेवण नेऊन पोहोच करीत आहेत. सकाळी 250 पर्यंत तर संध्याकाळी 100 लोकांचे जेवण विनामूल्य पुरविले जात आहे. 

दरम्यान, बिल्डर असोसिएशनच्या वतीनेही आजपासून दररोज सकाळी पोलिसांसाठी नाश्ता देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला. संजय संघवी, सुनील देशमुख, आदेश वडूजकर, जितेंद्र जाधव, दीपक काटे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

बिल्डर असोसिएशन लॉकडाऊन संपेपर्यंत दररोज सर्व पोलिसांना सकाळचा नाश्ता त्यांच्या जागेवर नेऊन पोहोच करणार आहे. 

मास्क आणि ग्लोव्हजचे वाटप

फेडरल बँकेच्या वतीनेही पोलिसांना मास्क व सॅनेटायझर व ग्लोव्हज यांचे वाटप करण्यात आले. बारामतीतील भिगवण चौकातील उत्तम ऑप्टिक्सच्या वतीने पोलिसांना संरक्षण म्हणून नीलेश महाडीक यांनी गॉगल्सचे वाटप केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Various Union Helping Needy Peoples and Police Personnel