

Devi Studio fire Vasai
sakal
विरार : वसईतील कामन परिसरात गुरुवारी दुपारी सुमारे १:३० वाजण्याच्या सुमारास ‘देवी स्टुडिओ’ (सीरियल शूटिंग सेट) येथे भीषण आग लागल्याची घटना घडली.आगीची माहिती मिळताच वसई विरार शहर महानगरपालिकाच्या अग्निशमन विभागाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात आहे.