
पारगाव - पारगाव, ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राज्यातील साखर उद्योगातील अग्रेसर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ( मांजरी बुद्रुक)यांचा सन २०२३-२४ करीता मध्य विभागातील 'सर्वोत्कृष्ठ ऊस विकास पुरस्कार' जाहीर झाला आहे.
राज्यातील २०२३-२४ गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणा-या कारखान्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हि.एस.आय.) यांच्यामार्फत देण्यात येणा-या पुरस्काराची घोषणा आज मंगळवारी संस्थेचे उपाध्यक्ष, आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. अशी माहिती भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.