
उरुळी कांचन : नायगाव (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या दोन्ही बाजूच्या भिंतीच्या कंपाऊंडचे काम संबंधित अधिकाऱ्यांनी सुरु केले असून त्यामुळे येथील शेतकऱ्यांना पूर्वीपासून असलेला वहिवाटीचा रस्ता बंद होत आहे. यामुळे शेतकरी आक्रमक होऊन त्यांनी कोर्टात धाव घेतली आणि कोर्टाने शेतकऱ्यांची बाजू समजून घेत भिंतीच्या कंपाऊंडच्या कामावर स्थगिती आणली आहे. तसेच याबाबत महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, अप्पर तहसिलदार, मंडळ अधिकारी यांच्याशी शेतकऱ्यांनी सातत्याने पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.