पुणे : माजी महापौर मुक्ता टिळक यांना पितृशोक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

कसबा विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार आणि माजी महापौर मुक्ता शैलेश टिळक यांचे ते वडील होत.

पुणे : भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताचा सोहळा असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव लिमये यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी (ता.३) निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. 

लिमये हे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनात 50 वर्षांपासून कार्यरत होते. लिमये हे भारतीय नौदलाच्या विक्रांत या लढाऊ नौकेवर काही काळ कार्यरत होते. तसेच टेल्को या नामांकित कंपनीतही त्यांनी कार्य केले.

- 'कोरोनामुळे लाखो खर्च झाले, आता खिशात दमडीही नाही'; कोरोनाबाधित कुटुंबाची दर्दभरी कहानी!

कसबा विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार आणि माजी महापौर मुक्ता शैलेश टिळक यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

माजी महापौर टिळक यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. त्यांच्या वडीलांचे कोरोना व्हायरस या घातक व्हायरसमुळे निधन झाल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जग या जागतिक महामारीचा सामना करत आहे. लिमये यांनाही कोरोनाची लागण झाली होती. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहनही टिळक यांनी केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vasantrao Limaye passed away at the age of 85