

पुणे, ता. ९ : शिरूर तालुक्यातील वसेवाडी (सणसवाडी) येथील जिल्हा परिषद शाळेने दहावीच्या निकालात शंभर टक्के यश संपादन करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एसएससी बोर्ड परीक्षेत शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या पुणे मॉडेल स्कूल उपक्रमांतर्गत सणसवाडी येथील या शाळेचा समावेश करण्यात आला आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना विद्यार्थ्यांनी निकालाच्या माध्यमातून दिलेला प्रतिसाद प्रेरणादायी असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.
या परीक्षेत आदिती रणपिसे (९३.२० टक्के), चंद्रिका मठपती (९३ टक्के), विनिता रैकवार (८९.९० टक्के), ईश्वरी कमटकर (८९.२० टक्के), तुषार ढेकळे (८८.४० टक्के) या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत विशेष यश प्राप्त केले. मुख्याध्यापक संतोष गोसावी यांच्या नियोजनामुळे सणसवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचा दहावीचा निकाल अभिमानास्पद लागला. पुणे मॉडेल स्कूल उपक्रमांतर्गत प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना विद्यार्थ्यांनी दिलेला हा यशस्वी प्रतिसाद असल्याचे पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.