कऱ्हाड आर्किटेक्टस् अँड इंजिनियर्स असोसिएशनतर्फे अभियंता दिन

कऱ्हाड आर्किटेक्टस् अँड इंजिनियर्स असोसिएशनतर्फे अभियंता दिन
Published on: 

वास्तुशास्त्रात हवा पारंपरिकतेसह आधुनिकतेचा समतोल

पुरुषोत्तम बेहेरे; कऱ्हाडला रघुनाथ पाटील यांना ‘सर विश्वेश्वरय्या’ पुरस्कार

कऱ्हाड, ता. ८ ः वास्तुशास्त्राकडे केवळ अंधश्रद्धेच्या किंवा भीतीपोटी न पाहता त्यातील पारंपरिक विचार, तर्क, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा योग्य समतोल साधणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वास्तुशास्त्र अभ्यासक पुरुषोत्तम बेहेरे यांनी केले.
कराड आर्किटेक्टस् ॲण्ड इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे झालेल्या ५९ व्या अभियंता दिनानिमित्त ‘वास्तुशास्त्र : समज आणि गैरसमज’ या विषयावर ते बोलत होते. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार धैर्यशील कदम, संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष लक्ष्मण पांढरपट्टे, सचिव अमित उंब्रजकर, खजिनदार अधिकराव पवार, संतोष खरात, अमित वानरे, विविध क्षेत्रांतील मान्यवर, आर्किटेक्टस्, इंजिनिअर्स उपस्थित होते.

श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘‘अभियंता केवळ बांधकामापुरते मर्यादित नसून समाजविकास प्रक्रियेचे मुख्य घटक आहेत. त्यामुळे त्यांनी त्या दृष्टीने त्या सगळ्याकडे पाहिले पाहिजे.’’
आमदार कदम यांनीही असोसिएशनला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रदीर्घ व उल्लेखनीय योगदानाबद्दल जलसंपदा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता रघुनाथ पाटील यांना यंदाचा ‘सर एम. विश्वेश्वरय्या पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सचिव उंब्रजकर यांनी मानपत्राचे वाचन केले. संचालक धैर्यशील यादव, रवींद्र सावंत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अध्यक्ष जाधव यांनी संस्थेच्या उपक्रमांचा आढावा घेतला. फिरोज अत्तार यांनी आभार मानले.


W56226
कऱ्हाड ः रघुनाथ पाटील यांना सर एम. विश्वेश्वरय्या पुरस्कार प्रदान करताना श्रीनिवास पाटील. त्या वेळी धैर्यशील कदम, राजेंद्र जाधव, लक्ष्मण पांढरपट्टे, अमित उंब्रजकर, अधिकराव पवार, संतोष खरात आदी.
....................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com