आंबेठाण - चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक दोन मधील प्रमुख बाजारपेठ असलेल्या वासुली फाटा (ता. खेड ) येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहे. प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील मार्गावर अतिक्रमणे झाली आहेत..यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून अतिक्रमणामुळे या परिसरात बकालपणा वाढला आहे. पायी चालायला देखील रस्ता मिळत नाही. अशी परिस्थिती झाल्याने या ठिकाणी झालेली अतिक्रमणे तात्काळ काढावी अशी मागणी जोर धरत आहे.वासुली फाटा ही चाकण एमआयडीसी मधील मोठी बाजारपेठ आहे. येथे चारही बाजूला उद्योगधंदे झाल्याने नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी मोठी बाजारपेठ तयार झाली. परंतु रस्त्याच्या कडेला वाढते व्यापारी गाळे, पथारी व्यावसायिक, हातगाडीवर व्यवसाय करणारे व्यावसायिक यांच्यासारख्या अनेक लहान मोठ्या व्यवसायायिकांनी रस्तेच गिळंकृत केले आहेत. गुरुवारी आणि रविवारी या ठिकाणी जरी बाजार असला तरी इतर दिवशी देखील मोठी गर्दी असते..रस्त्याच्या कडेला अनेक गाळामालकांनी स्वतःच्या जागेत जरी व्यापारी गाळे उभारले असले तरी त्याचे ओटे, पार्किंगची जागा ही सरकारी रस्त्यावर केली आहे. दुकानांपुढे लोखंडी शेड केले आहे. दुकानातील माल त्या शेडमध्ये किंवा कधीकधी त्याच्याही पुढे ठेवला जात आहे. दुकानांचे नामफलक सुद्धा रस्त्यावर आले आहेत.त्यामुळे सध्या वाहतुकीला अरुंद असणारा रस्ता अजूनच अरुंद ठरत आहे..स्थायिक दुकानदारांबरोबर दररोज रस्त्यावर भाजीपाला,मासे,फळविक्री करणारे यासारखे अन्य व्यावसायिक रस्त्यावरच आपले बस्तान मांडत आहे. अनेक वेळा रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणारे व्यावसायिक वाहनचालकांना, प्रवाशांना किंवा पायी चालणाऱ्या नागरिकांना दमदाटी करीत असतात.भोसरी आणि निगडी मार्गे या ठिकाणी बसव्यसस्था सुरू करण्यात आली आहे. परंतु भांबोली फाटा ते वासुली फाटा या दरम्यान बस चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. वासुली फाटा येथे पावलोपावली पान टपऱ्यां टाकल्या गेल्या आहेत. मुख्य रस्त्याच्या अगदी वळणावर टपऱ्या असल्याने वाहने वळत नाहीत. त्यामुळे अनेक वेळा दुकानदार आणि वाहनचालक यांच्या वाद होताना दिसत आहे..व्यापारी गाळे करताना जागेला उंची दिल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येत असते. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचत आहे. परिणामी अर्धा रस्ता पाण्यात गेल्याने वाहतुकीला अर्धाच रस्ता शिल्लक राहत आहे. त्यात दुतर्फा अतिक्रमण झाल्याने एकच वाहन प्रवास करेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भांबोली फाटा,वासुली फाटा या भागात झालेले अतिक्रमण काढावे अशी मागणी होत आहे..बाळासाहेब राऊत (स्थानिक नागरिक) -या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. माझे देखील व्यापारी गाळे आहेत.शासनाने अतिक्रमण काढून रस्ता खुला करणे गरजेचे आहे. ज्यांनी गाळे भाड्याने घेतले आहे. त्यांचे देखील काही लोकांच्या अतिक्रमणामुळे नुकसान होत आहे. अतिक्रमणामुळे बकालपणा वाढत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.