'वंचित'चं ठरलं! आगामी निवडणुकांची तयारी सुरु; पुण्यात पार पडली गुप्त बैठक : VBA Meeting at Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

I am a dictator says advocate Prakash Ambedkar in press conference at akola

VBA Meeting at Pune: 'वंचित'चं ठरलं! आगामी निवडणुकांची तयारी सुरु; पुण्यात पार पडली गुप्त बैठक

पुणे : वंचित बहुजन आघाडी आगामी निवडणुकांच्या तयारीला लागली आहे. यासाठी वंचितचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गुप्त बैठक पार पडल्याचं सूत्रांकडून कळतं आहे. या बैठकीत आंबेडकर यांनी पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत. (VBA Meeting held at Pune regarding ahead elections aaliance with Shivsena)

आगामी निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी कामाला लागली असून पुण्यात वंचितच्या राज्यातील जिल्हाध्यक्षांची गोपनीय बैठक पार पडल्याची माहिती मिळतेय. या बैठकीत निवडणुकांच्या तयारीला लागा अशा सूचना प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत. ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रितरित्या या निवडणुका लढणार असून निवडणुकीत युती होणार या दृष्टीनं तयारी करण्याच्या सूचनाही या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या असल्याचं वृत्त आहे.