वीर गोगदेव जन्मोत्सवानिमित्त कॅम्प भागात जय्यत तयारी सुरू

मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने यंदा वीर गोगदेव जन्मोत्सवाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
pune
puneSakal

कॅंटॉन्मेंट : मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने यंदा वीर गोगदेव जन्मोत्सवाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने संपूर्ण पुणे शहरातून भवानी पेठ हरकानगर, खडक हद्द, कॅम्प, अंबिलोढा कॉलनी, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, नायडू हॉस्पिटल, ताडीवाला रोड, बरनिंग घाट, घोरपडी, रामटेकडी, हडपसर, भारत फोर्स, वानवडी, महंम्मदवाडी, औंध, पाटील इस्टेट अशा विविध भागातून कॅम्प येथील ट्रायलक चौकातील गोगामेढी येथे सुमारे ३० निशाणे मिरवणूकासह भेटीस येणार आहे. दरवर्षी प्रमाणे सुमारे ५० ते ६० हजार भाविक या मिरवणुकीत महिला व लहान मुलांसंहित नटून थटून पापांपरिक वेशभूषेत सहभागी होतात. निशाणांसह सहभागी झालेल्या मिरावणुकांना ‘बागड’ असे म्हटले जाते. बागड हा मेहतर वाल्मिकी समाजाचा सर्वात मोठा हा सण मानला जातो.

गुरु गोरक्षनाथ यांच्या प्रसादाने राजा जेवर व राणी बाछल यांना गोगा जाहरवीर रूपात पुत्र म्हणून लाभलेले वीर गोगदेव यांच्या जन्मोत्सवाला २९२ वर्षात पदार्पण होत आहे. त्यांचे प्रतीक म्हणून मानल्या जाणाऱ्या निशाणाची स्थापना सुमारे १७३२ साली केली गेली. गोगदेव यांनी समाधी घेण्यापूर्वी त्यांचे शिष्य शामलाल चावरिया आणि भक्त दुलीचंद यांना त्यांच्या चिरंतर आठवणीत पूजेसाठी त्यांच्या हाती झेंडा दिला होता. म्हणून आजही गोगदेव यांचे प्रतीक म्हणून श्रावण महिन्यात अनेक ठिकाणी (झेंडा) निशाण बसविले जाते.

भवानी पेठेतील रामलाल भगत व कॅम्प भागातील अशोक संघेलिया हे मानाचे निशाण आखाडा म्हणून ओळखले जाते. तसेच बाराभाई निशाण, गोपाळ भगत, दिनेश भगत, कालू भगत, सचिन तुरे, सुवर्ण बाराभाई हे निशाण आखाडा हरकानगर येथे गेल्या अनेक वर्षापासून बसविण्यात येत आहे. यावेळी निशाणांना विद्युत रोषणाई, हार, फुले, शेरे, मोरांच्या पिसांनी सजवून नाचविले जाते. २१ दिवस या निशाणाची पूजा करून उपवास, अन्नदान, भजन, कीर्तन करून धार्मिक विधी सह सामाजिक प्रबोधन ही केले जाते. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून उत्सवाची सुरुवात करून कृष्ण जन्माअष्टमीच्या दिवशी सांगता करण्यात येते. यावेळी कॅम्प भागात बाटा चौक ते महंमद रफी चौकापर्यंत व्यासपीठ व मांडव टाकून निशाणांच्या स्वागताची तयारी मान्यवरांकडून केली जात असल्याची माहिती भगवान गोगदेव धर्मसभाचे वरिष्ठ मार्गदर्शक वस्ताद रमेश चव्हाण, प्रमुख शैलेन्द्र जाधव, प्रवक्ता दीपक उमंदे तसेच निशाण आखाडा प्रमुख कविराज संघेलिया यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com