नेहमी विद्यार्थ्यांची आतुरतेने वाट पाहणारी 'ती' आता...

नेहमी विद्यार्थ्यांची आतुरतेने वाट पाहणारी 'ती' आता...

रामवाडी (पुणे) : कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येऊ लागल्याने हातावर हात ठेवून किती दिवस कोरोना जाण्याची आणि लॉकडाउन उठण्याची वाट पाहत बसणार. यासाठी नागरिक स्वतःहून नवनविन व्यावसायाकडे वळले आहेत. ज्या स्कूल व्हॅनने अनेक विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहोचवले व आणले. त्या स्कूल व्हॅनमध्ये सध्या भाजी व फळांची विक्री करून दैनंदिन आर्थिक खर्च भागवला जात आहे. कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे स्कूल व्हॅनही बंद असल्याने पैसा येणार कुठुन? परिणामी पैसा नसल्याने कॅन्सरग्रस्त आईवर त्यांना उपचार करता न आल्याने आईने दोन महिन्यांपूर्वीच या जगाचा निरोप घेतला.

वडगाव शेरी येथे राहणारे निलेश अहिर हे पंधरा वर्षांपासून शाळेच्या विद्यार्थाना शाळेत वेळेवर पोहोचवणे व आणणे, हे त्यांचे दैनंदिन काम करत होते. या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांतून सहा जणांचा खर्च भागत होता. त्यातूनच आईच्या आजारावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु होता.  त्याचबरोबर दोन मुलांच्या शाळेचा खर्च, घरातील खर्च हे सर्व भागवला जात होता. पण, कोरोनाचे संकट आले आणि शाळा बंद झाल्या. मार्च महिन्यापासून घरी बसावे लागले. जवळ होता, तोही पैसा संपला. कोणता व्यवसाय सुरू करावा, या विचारात ते होते. सध्या चलतीमध्ये असलेला भाजी व फळ विक्री हा व्यवसाय सुरु केल्याने किमान रोजचा खर्च तरी भागवला जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शाळा कधी सुरू करतील माहीत नाही. पूर्वी व्हॅनमध्ये बारा विद्यार्थी असायचे, जर स्कूल सुरू झाल्यावर सरकारने फक्त चार विद्यार्थ्यांना व्हॅनमध्ये ने-आण करण्याची परवानगी दिली. तर आमचं अर्थिक बजेट नक्कीच कोलमडणार, यासाठी सरकारने आम्हा चालकांच्या बाजूने विचार करावा व थोडाफार मदतीचा हात पुढे करावा, असे मला वाटते.
- निलेश अहिर, चालक, स्कूल व्हॅन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com