बीट ,गवार ,कारली, वांगी स्वस्त,'' '' कोथिंबीर, टोमॅटोच्या भावात सुधारणा

बीट ,गवार ,कारली, वांगी स्वस्त,'' '' कोथिंबीर, टोमॅटोच्या भावात सुधारणा

Published on

भाजीपाल्याचे दर घसरले; फळबाजारात तेजी कायम
ज्वारी, सोयाबीनला उतरती कळा; लिंबू, खरबूज, आंब्याला मागणीमुळे दरवाढ
सकाळ वृत्तसेवा
उ. सोलापूर, ता. २१ : फळभाज्यांच्या दरात घट होत असून, घाऊक बाजारात बीट, गवार, वांगी या फळभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. कोथिंबिरीची आवक दहा हजार पेंड्यांपेक्षा जास्त झाल्यानंतरही मागणी कायम असल्यामुळे दरात सुधारणा आहे. तळाला असलेल्या टोमॅटोच्या भावातही थोडीशी सुधारणा झाली आहे. भुसार बाजारात मात्र मंदीचे वातावरण असून, नवीन ज्वारी बाजारात दाखल होत असल्यामुळे ज्वारीचे दर कमी होत आहेत.
सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये गत आठवड्याच्या तुलनेने चालू आठवड्यात फळभाज्यांच्या दरामध्ये घसरण दिसून आली. फळ बाजारात मात्र मागणी वाढली आहे. वाढत्या उन्हाबरोबरच किरकोळ बाजारात फळ खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. यामुळे खरबुजाच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. बोरांची आवक घटल्यामुळे बोरांच्या दरातही चांगलीच वाढ झाली आहे. लिंबूच्याही दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, लिंबूचे दर प्रतिकिलो ९० रुपयांपर्यंत पोचले आहेत. बाजारात आंबा दाखल झाला असून, आंब्याला प्रतिकिलो १७० रुपये इतका दर मिळाला आहे. द्राक्षांचीही आवक बाजारात वाढली आहे; मात्र डाळिंबाची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. कांदा बाजारातील मंदी कायम असून, चालू आठवड्यात सरासरी दैनंदिन ५०० मालगाड्या कांदा बाजारात विक्रीसाठी दाखल झाला; मात्र दर तळाला असल्यामुळे उत्पादकांची निराशा होत आहे. बाजारात ज्वारीचे नवीन पीक दाखल होत आहे, त्यामुळे ज्वारीच्या दरातील तेजी थांबली असून, प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपयांची घसरण सुरू झाली आहे. सोयाबीनच्या दरातही गत आठवड्याच्या तुलनेने घसरण झाली आहे.
---
चौकट
कोथिंबीर ५००-८००
मेथी ६००-८००
राजगिरा ३००-६००
शेपू ५००-७००
पालक २००-३००
तांदूळसा २००-४००
अंबाडी ४००-५००
कांदापात ५००-७००
चुका ३००-३००
---
फळभाज्यांचे प्रति दहा किलो कमाल व सरासरी दर
बीट ७०-१००
कारले २००-३५०
वांगी १८०-३५०
कोबी ४०-५०
ढोबळी मिरची २००-४५०
गाजर १००-१५०
गवार ६००-८५०
काकडी २००-३००
घेवडा २५०-३००
हिरवी मिरची ४००-५००
भेंडी ४००-६००
लिंबू ५००-९००
दोडका २००-४००
टोमॅटो ६०-१००
बटाटा १००-१३०
मुळ्याची शेंग ३००-३५०
वाटाणा २८०-३३०
बीन्स २००-२२०
तोंडले २५०-३००
शेवग्याची शेंग ४००-५००
लिंबू २००-२९०
फ्लॉवर (१०० नग) ८००-१०८०
---

फळांचे प्रति दहा किलो दर
सफरचंद ९००-१४००
बोरे ५००-५३०
चिकू २००-३५०
पेरू १४०-२६०
मोसंबी २००-३२०
पपई १२०-१५०
अननस २५०-३००
सीताफळ ८००-८००
डाळिंब १२५०-२२५०
द्राक्ष (पेटी) २४०-४००
संत्रा ६००-७५०
खरबूज २००-४००
कलिंगड १५०-२८०
आंबा १७००-१७००
---
भुसार बाजार, प्रतिक्विंटल दर
गूळ ३९५१-४१५०
तूर ७६००-७७००
हरभरा ५२००-५३५०
ज्वारी ३४५०-३७००
---
चौकट
लसणाच्या दराचा वारू थांबला
बाजारात लसणाच्या दरात अचानक वाढ झाली होती. गेल्या दोन महिन्यांत लसणाच्या दरात दुपटीने वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र, सध्या या दराला ब्रेक लागला आहे. गेल्या आठवड्यात बारा हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे विकलेला लसूण दहा हजार प्रतिक्विंटलच्या जवळ विकला गेला आहे. सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसणाचे दर ७५००-१०५०० प्रतिक्विंटल इतके आहेत.
---
कांदा उत्पादक मात्र चिंतेत
सध्या सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज जवळपास ५०० मालगाड्या कांद्याची आवक होते आहे. दर मात्र तळालाच आहेत. शनिवारी (ता. २१) ४५ हजार ६२१ क्विंटल कांद्याची आवक झाली. या कांद्याला २००० इतका कमाल तर सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com