ओतूर पोलिस ठाणे हद्दीतील १० प्रकरणांत आरोपींना दंड

ओतूर पोलिस ठाणे हद्दीतील 
१० प्रकरणांत आरोपींना दंड
Published on

ओतूर, ता. १९ : ओतूर (ता. जुन्नर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोटार वाहन कायदा व भारतीय न्याय संहितेच्या १० प्रकरणांतील आरोपींनी गुन्हा कबूल केल्याने जुन्नर न्यायालयाने त्यांना दंडाची शिक्षा सुनावली. यात एकूण नऊ प्रकरणांत लोकअदालतीत, तर एका प्रकरणात नियमित सुनावणीद्वारे कारवाई झाली.
सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबरच्या लोकअदालतीत मोटार वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत सहा आरोपींना प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. यामध्ये राजू उत्तम राठोड (रा. उंब्रज नं. २), गणेश ज्ञानदेव भापकर (रा. वडुले), मिलिंद सुनील औटी (रा. हिवरे खुर्द), भीमा शंकर वाजे (रा. कळस बु.), रामभाऊ हरिभाऊ काळे (रा. साकूर मांडवे) आणि तेजस राजेंद्र कोंडे (रा. धामणखेल) यांचा समावेश आहे.
भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५ अंतर्गत सदाशिव लक्ष्मण लांडगे (रा. ब्राम्हणवाडा) आणि कलम २८१ अंतर्गत अंकुश बाळाशीराम लोहोटे व सौरभ संतोष भिसे (रा. डिंगोरे) यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड झाला. तर, १७ सप्टेंबर रोजी राजेश रामदास बुरकुल (वय ३३, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) याला मोटार वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक शुभमकुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, नामदेव बांबळे, श्यामसुंदर जायभाये, किशोर बर्डे व अतुल भेके यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com