पुणेकरांनो, आता पुर्णवेळ घरातच बसा कारण, पुणे पोलिसांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

पुण्याचे पोलिस आय़ुक्त के. व्यंकटेशम यांनी आज सकाळी याबाबत एका ट्विटला उत्तर देताना या बंदीचे सूतोवाच केले होते. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह, ओला, उबर अशा सेवाही बंद होतील. नागरिकांना त्यांची वाहने रस्त्यावर आणता येणार नाहीत. राज्यातील नागरी भागांत संचारबंदी सुरू असली तरी अनेक ठिकाणी वाहतूक सुरू आहे. लोकांनी संचारबंदी पूर्णपणे मनावर न घेतल्याने पोलिसांना हे पाऊल उचलावे लागत आहे. आधी संध्याकाळपासून हा निर्णय घेतला जाणार होता. आता दुपारी तीन वाजताच त्याची अंमलबजावणी होणार आहे. 

पुणे : पुणेकरांनो, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे आता पूर्णवेळ घरातच बसा. पु्ण्यात आज दुपारपासून वाहतूक पुर्णपणे थांबविणार असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असुनही नागरिक बेफ़िकीरपणे रस्त्यावर फिरत असल्यामुळे अखेर पोलिसांकडून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. आज दुपारी 3 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पोलिसांकडुन आजपासून 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेश देण्यात आला होता. असे असतानाही नागरीक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जमावबंदीच्या आदेशाला नागरीकांनी गांभीर्याने घेतले नसल्याची सद्यस्थिती आहे

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याचे पोलिस आय़ुक्त के. व्यंकटेशम यांनी आज सकाळी याबाबत एका ट्विटला उत्तर देताना या बंदीचे सूतोवाच केले होते. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह, ओला, उबर अशा सेवाही बंद होतील.
 

या पार्श्वभुमीवर पोलिसांनी बेफ़िकीरपणे फिरणाऱ्या नागरिकांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज दुपारी 3  वाजल्यापासून होणार आहे. त्यास पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी दुजोरा दिला आहे. त्याबाबतचा आदेश पोलिस सह आयुक्त डॉ. रवीन्द्र शिसवे यांच्याकडुन  प्रशासनाकडुन काढण्यात येणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना रस्त्यावर येता येणार नाही, त्यांची वाहने अडवून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicle Movement stop from 23 march Afternoon By Pune Police