esakal | पुण्यात गुंडांनी दिले पोलिसांनाच आव्हान; दहशत माजवण्याचा प्रयत्न!

बोलून बातमी शोधा

Vehicle Validations by Goons of gangs in Mohammadwadi for taking Action under mocca}

खुनाचा प्रयत्न, दरोड्यासह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे करणाऱ्या वानवडीतील एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायद्यानुसार (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यात गुंडांनी दिले पोलिसांनाच आव्हान; दहशत माजवण्याचा प्रयत्न!
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : वानवडीमध्ये दोन गटात वारंवार होणा करणाऱ्या चकमकीचा सर्वसामान्याना फटका बसत असल्याने पोलिसांनी संबंधित टोळीवर शुक्रवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) अंतर्गत कारवाई केली. मोक्का'अंतर्गत कारवाई केल्याचा राग आल्याने संबंधित टोळीच्या सदस्यानी महमदवाडीमध्ये शुक्रवारी रात्री दहशत निर्माण करीत पुन्हा एकदा 10 ते 12 वाहनाची तोडफोड करीत थेट पोलिसांनाच आव्हान दिले.

खुनाचा प्रयत्न, दरोड्यासह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे करणाऱ्या वानवडीतील एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायद्यानुसार (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी शुक्रवारी त्याबाबतचा आदेश दिला. कारवाई केलेल्यामध्ये टोळीप्रमुख गिरीश ऊर्फ सनी महेंद्र हिवाळे (वय 21, रा. काळेपडळ, हडपसर), आकाश संतोष भारती (वय 20, रा. साठेनगर, हडपसर), चेतन पांडुरंग ढेबे (वय 23, रा.महादेवनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता), अनिेकत ऊर्फ मॉन्टी शरद माने (वय 20, रा.साठेनगर, हडपसर), काजल मधुकर वाडकर (वय 21, रा.वाडकर मळा, हडपसर), अंबिका अर्जुन मिसाळ (वय 21, रा. साठेनगर, हडपसर), सुरज महादेव नवगिरे (वय 19, रा.सावतामाळी चौक, उरुळी देवाची) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवून हत्यारासह खुनाचा प्रयत्न करणे, जबर दुखापत करुन दहशत निर्माण करणे, जबरी चोरी, दरोडा, खंडणी वसुल करणे, घातक शस्त्र विनापरवाना बाळगणे या स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या संघटीत गुन्हेगारीमुळे संबंधीत परिसरातील नागरीक, व्यापारी यांच्या जीवीतास व मालमत्तेस धोका असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

गिरीश उर्फ सनी हिवाले याच्या टोळीविरुद्ध पोलिसांनी कारवाई केल्याने सर्वसामान्याकडून समाधान व्यक्त केले जात होते. दरम्यान शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक टोळके महमदवाडी परिसरात आले. हातात हत्यारे घेऊन त्यांनी तूफान गोंधळ घातला.त्यानंतर रस्तयाच्याकडेला नागरीकांनी पार्किंग केलेल्या वाहनाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. या घटनेत स्थानिक नागरीकांच्या 10 ते 12 वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या घटनेची खबर मिळताच वानवडी पोलिस घटनेच्या ठिकाणी आले.