esakal | वेल्हे पोलीस स्टेशनला मिळणार हक्काची इमारत
sakal

बोलून बातमी शोधा

वेल्हे पोलीस स्टेशन

वेल्हे पोलीस स्टेशनला मिळणार हक्काची इमारत

sakal_logo
By
मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे : शिवछत्रपतींच्या कर्मभूमी वेल्हे तालुक्यामध्ये भाड्याच्या खोलीमध्ये चालणाऱ्या पोलीस स्टेशनची परवड थांबणार असून पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी दोन कोटी ८४ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून सततच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे आमदार संग्राम थोपटे यांच्या मागणीला यश आल्याचे थोपटे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

वेल्हे तालुक्यात मध्ये किल्ले तोरण्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वेल्हे गावांमध्ये पोलीस स्टेशनची हक्काची इमारत नसून अनेक वर्षापासून भाड्याच्या खोलीत पोलिस स्टेशनचे कामकाज चालू होते अनेक वर्षापासून वंचित असलेल्या पोलिसांना खरा न्याय मिळाला असल्याची भावना निर्माण झाली आहे. ऐतिहासिक असे किल्ले तोरणा, राजगड, तसेच गुंजवणी धरण पानशेत ,वरसगाव धरण दुर्गम भौगोलिक भागामध्ये असलेली १३० गावे परंतु परंतु बोटावर मोजण्याइतके पोलीस दल त्यातच पोलीस स्टेशनची हक्काची इमारत नसल्याने आरोपी अटक केल्यानंतर लॉक अप सुविधा नाही.

हेही वाचा: ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी

आरोपीस पोलीस कोठडी मिळाल्यास भोर किंवा लोणी काळभोर किंवा मुळशी तालुक्यातील पौड येथे आरोपी घेऊन जावे लागत होते तर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह ,पोलिसांसाठी रेस्टरूम नसणे अशा गैरसोयी मुळे येथील पोलिस कर्मचारी मानसिक तणावाखाली काम करत आहेत. पोलीस स्टेशनची स्वतःच्या मालकीची १हेक्टर ४२ गुंठे जागा असल्याने आमदार संग्राम थोपटे यांनी इमारत बांधकाम करण्यासाठी रीतसर प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात आला होता तर मंत्रालय येथे चार सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निधीची मागणी केली होती यानुसार वेल्हे पोलीस स्टेशनसाठी दोन कोटी ८४ लाख रुपये निधी मंजूर झाले असल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली यासाठी थोपटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत .

वेल्हे तालुक्यामध्ये कोणत्याही मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची श्रेय वादाची नेहमीच लढाई होत असते यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो पोलीस स्टेशन इमारती संदर्भात ही तसाच अनुभव वेल्हे

करांना आला राष्ट्रवादी काँग्रेस कडून खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुळे या इमारतीला निधी मंजूर झाल्याचे सोशल मीडियावर पोस्टर फिरत होते तर आमदार संग्राम थोपटे यांनी केलेला पत्रव्यवहार तसेच सततच्या पाठपुराव्यामुळे पोलीस स्टेशनची इमारत मंजूर झाल्याचे पोस्टर काँग्रेस कडून सुद्धा सोशल मीडियावर फिरत होते .

loading image
go to top