उपचाराअभावी मृत्यू झालेल्या प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद; मदतीचे दिले आश्वासन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mla Sangram Thopate

वेल्हे तालुक्यातील करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने एका हाँटेल कामगाराचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाला झाला होता.

Sangram Thopate : उपचाराअभावी मृत्यू झालेल्या प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद; मदतीचे दिले आश्वासन

वेल्हे, (पुणे) - वेल्हे तालुक्यातील करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने एका हाँटेल कामगाराचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाला झाला होता. याचे पडसाद अधिवेशनात पडल्याचे पहायला मिळाले. यावर आमदार संग्राम थोपटे यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तेवढ्याच तत्परतेने दखल घेत याबाबत लवरकच बैठक घेऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. ३ जानेवारी२०२३ रोजी उपचारा न मिळाल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याबाबत सर्वात अगोदर दैनिक सकाळने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

करंजावणे येथील आरोग्य केंद्रात गणेश महादेव सावंत या कामगाराचा उपचारा अभावी मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिकांनी याचा संताप व्यक्त केला होता. याबाबत वेल्हे पोलिसात देखील याची नोंद करण्यात आली होती. मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सध्या अधिवेशन सूरु असल्याने भोर, वेल्हे, मुळशीचे विधानसभा मतदार संघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी याबाबत अधिवेशनात आरोग्य मंत्र्यांना घटनेची आप बीती सांगितली. आरोग्य मंत्र्यांनी याबाबत सांगितले.की, आपल्यापर्यंत हि घटना पोहचली असून याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा करून लवकरच यावर बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले.

गेली अनेक दिवसापासून भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यातील आरोग्य केंद्रांचा प्रश्न ऐरणीवर आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी पुरेसे डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आमदार संग्राम थोपटे यांनी केली आहे.

टॅग्स :deathMLATreatmentvelhe