

Kadave villagers stage a protest at Velhe Tehsil Office over water shortage despite the monsoon.
Sakal
वेल्हे (पुणे) : पानशेत धरण परिसरातील कादवे (ता.राजगड) येथील नळ पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवर शासकीय निधीतून लाखो रुपये खर्च करून राबविण्यात आलेली पाणी पुरवठा योजना वादात अडकल्याने ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने येथील संतप्त महिलांसह ग्रामस्थांनी हांडे घेऊन मंगळवार (ता.११) रोजी वेल्हे येथील राजगड तालुका तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.