Velhe Crime
sakal
वेल्हे (पुणे) - जुन्या भांडणाच्या वादातून विजय मारुती वसवे (वय-४७, रा. मालवली, ता. राजगड, जि. पुणे) यांच्यावर पाठीमागून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना राजगड तालुक्यातील कातुर्डेवाडी परिसरात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील आरोपी ओंकार बाळू जाधव (वय-२०, रा. मालवली, ता. राजगड, जि. पुणे) याला वेल्हे पोलिसांनी अवघ्या आठ तासांत ताब्यात घेतले.