Trekker Heart Attack : लिंगाना किल्ल्याच्या पायथ्याशी जेष्ठ ट्रेकरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याच्या हद्दीस लागुन असलेल्या रायगड जिल्ह्यातील लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्याशी ट्रेकिंग करण्यासाठी आलेल्या जेष्ठ ट्रेकरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.
Ajay Kale
Ajay Kalesakal
Summary

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याच्या हद्दीस लागुन असलेल्या रायगड जिल्ह्यातील लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्याशी ट्रेकिंग करण्यासाठी आलेल्या जेष्ठ ट्रेकरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.

वेल्हे, (पुणे) - पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याच्या हद्दीस लागुन असलेल्या रायगड जिल्ह्यातील लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्याशी ट्रेकिंग करण्यासाठी आलेल्या जेष्ठ ट्रेकरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवार (ता.२७)रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली तब्बल ११तासाच्या अथक प्रयत्नांनंतर रेस्क्यू टिमला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून शव विच्छेदनानंतर अंतरिम अहवालात मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर खोल दरीत पडून मृत्यू झाल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली.

अजय बबनराव काळे (वय.६२) राहणार बी/402 नीलकंठ गार्डन सोसायटी जुने पनवेल जिल्हा रायगड असे या जेष्ठ पर्यटकाचे नाव आहे .याबाबत मुलगा आशुतोष काळे वेल्हे यांनी वेल्हे पोलीस स्टेशन मध्ये जबाब दिला आहे.

मृत काळे यांना ट्रेकिंगची आवड असल्याने त्यांनी अनेक लहान मोठे ट्रेक केले होते. रविवार (ता.२६) रोजी पुणे येथील सह्याद्री ॲड व्हेंचर इन्स्टिटय़ूट या संस्थेतील मित्रांसोबत घरातून निघाल्यानंतर सोमवारी (ता.२७)रोजी सकाळी किल्ले लिंगाण्याच्या पायथ्याशी पोहोचले.

लिंगाणा किल्ला हा रायगड जिल्ह्याच्या हद्दीत आहे. परंतु किल्ल्याकडे जाण्यासाठी पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातून सिंगापूरमार्गे रस्ता आहे. ट्रेक सुरु असतानाच काळे यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्या हातात असलेले स्मार्ट वॉच त्यांचे बिघडलेले ह्रदयाचे ठोके व रक्तदाब दाखवत होते परंतु दुर्गम मार्ग असल्याने कोणतीच साधने उपलब्ध नव्हती सोबत असलेल्या मेडिकल किटने उपचार करणे मुश्किल होते. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती सोबत असलेल्या ट्रेकर्सनी दिली. दरम्यान स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार काळे हे खोल दरीत कोसळल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती.

दुर्गम भाग असल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रशिक्षित रेस्क्यू टीमची गरज होती. काळे यांच्या सोबत असलेल्या ट्रेकर्सनी परत मोहरी गावात येऊन एस.एल.ऍडव्हेंचर टीमला संपर्क करून मदत मागवली. सोमवारी दुपारी ०४ वाजता तुषार दिघे, कृष्णा मरगळे, रोहित अंदोडगी ही एस.एल .एडव्हेंचरची टीम आवश्यक उपकरणांनसह मोहरी गावाजवळ दाखल झाली. खडतर रस्ता, रात्रीचा अंधार यामुळे एरव्ही साधे चालणेही मुश्किल असलेल्या डोंगर दऱ्याच्या वाटेवरून रोपव्दारे बनवलेल्या स्ट्रेचरवरून मृतदेह आणणे हे जिकीरीचे होते. त्यानंतर जवळजवळ ११ तास रेस्क्यू मोहीम राबवून मंगळवारी पहाटे ३ वाजता मृतदेह मोहरी गावात आणण्यात यश आले.

वेल्ह्याचे पोलीस उपनिरीक्षक एम. के. कदम ,पोलीस हवालदार प्रदीप कुदळे ,पोलीस कॉन्स्टेबल वाय. के सोमवंशी,तानाजी भोसले, गणेश संपकाळ,शिवाजी पोटे, अंकुश तुपे आदी स्थानिक नागरिकांनी मदत केली.अजय काळे यांना वेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत भोईटे यांनी घोषित केले.

एस.एल ऍडव्हेंचरचे प्रमुख लहू उघडे म्हणाले की, उन्हाळ्यात दुर्गम ठिकाणी ट्रेकिंगला जाताना आपल्या शरीराची क्षमता ओळखून साहस केले पाहिजे. सोबत पुरेसे पाणी, सुकामेवा हे घेणे गरजेचे आहे. तसेच अशा मोहिमा या प्रशिक्षित गिर्यारोहकाच्या मार्गदर्शनाखाली कराव्यात. दुर्गम ठिकाणी कसलेही नेटवर्क नसल्याने काही अघटित घडल्यास संपर्क साधने मुश्किल होते. त्यामुळे पायवाटा माहिती असलेल्या ग्रुपसोबतच ट्रेकिंगला जावे. कालच्या प्रकरणातही नेटवर्क नसल्याने त्यांना संपर्क करणे मुश्किल झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com