
वेल्हे : पानशेत (ता.राजगड) येथे आदिवासी कातकरी समाजाच्या युवकाचा दगडाने ठेचुन निघृण खुन करण्यात आल्याची घटना रविवार (ता.15) रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात सोमवार (ता.१६) रोजी गुन्हा दाखल झाला आहे. रोहिदास काळुराम काटकर ( वय २४, रा.कादवे ,ता. राजगड) असे मयत युवकाचे नाव आहे.घटनेनंतर मोटरसायकल वरुन आलेले सर्व हल्लेखोर फरार झाले. याप्रकरणी मृत व्यक्तीचा भाऊ अविदास काळूराम काटकर याने वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.