मतदारयादीतील दुबार नावे वगळण्यासाठी घरी जाऊन करणार पडताळणी

मतदार याद्यांमध्ये दुबार नावे वगळणे आणि इतर त्रुटी करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आता प्रत्यक्ष घरी भेट देऊन पडताळणी करणार आहेत.
Voter List
Voter ListSakal

पुणे - मतदार याद्यांमध्ये (Voter List) दुबार नावे (Names) वगळणे आणि इतर त्रुटी करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आता प्रत्यक्ष घरी भेट देऊन पडताळणी (Verification) करणार आहेत. त्यामुळे मतदारयाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेली दुबार नावे कमी होणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने एक जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत ९ ऑगस्ट (सोमवार) ते ३१ ऑक्टोबर २०२१ (रविवार) पर्यंत दुबार व समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, त्रुटी दूर करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन पडताळणी करणार आहेत. तसेच, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.

Voter List
पुणे-नाशिक हायस्पिड रेल्वेला शेतकऱ्यांचा विरोध

येत्या एक नोव्हेंबर २०२१ (सोमवार) रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. एक नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि दावे स्वीकारण्यात येणार आहेत. २० डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. त्यानंतर पाच जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतील एकूण मतदार संख्या ७८ लाख ८७ हजार ६८१

- पुरुष मतदार : ४१ लाख २८ हजार ३९२

- महिला मतदार : ३७ लाख ५९ हजार २८९

पुणे शहरातील मतदारसंघ आणि मतदार संख्या

  • वडगाव शेरी - ४,६१,९७६

  • शिवाजीनगर - ३,०६,४२०

  • कोथरूड - ४,१३,३८९

  • खडकवासला - ४,९५,९७६

  • पर्वती - ३,५४,४७१

  • हडपसर - ५,१९,७१७

  • पुणे कँटोन्मेंट - २,९२,९०९

  • कसबा पेठ - २,९३,२२४

  • एकूण मतदार - ३१,३८,०८२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com