

Homebuyers in Distress: Vertillas Society Members Protest Against Developer Kothari
esakal
पुणे ः ज्या सदिनेका हप्ता भरत आहे त्याचा ताबा मिळेल याची शाश्वती नाही. स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहिले असता आता बेघरासारखे जगावे लागत आहे. भाड्याचा बोजा, कर्जाचे हप्ते आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अवस्था अधिकच बिकट झाली आहे. महारेरा आणि पोलिस प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही ठोस कारवाई होत नाही, अशी व्यस्था मांडली खराडी येथील ‘व्हर्टीलास सहकारी गृहरचना संस्था मर्यादित संस्थेत’ सदनिका बुक केलेल्या सदनिकाधारकांनी.