
पुणे : ज्येष्ठ लेखिका, प्रवासवर्णनकार डॉ. मीना प्रभू (वय ८५) यांचे शनिवारी दुपारी येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मीना प्रभू यांचा जन्म आणि शिक्षण पुण्यात झाले होते. त्यांनी पुण्यातच वैद्यकीय शिक्षण (एम. बी. बी. एस.) पूर्ण केले. त्यानंतर मुंबई व लंडन येथून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. विवाहानंतर त्या लंडन येथे स्थायिक झाल्या होत्या. ‘माझं लंडन’ हे त्यांचे पहिले प्रवासवर्णनपर पुस्तक होते.