esakal | ज्येष्ठ चित्रकार देविदास पेशवे यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ चित्रकार देविदास पेशवे यांचे निधन

ज्येष्ठ चित्रकार देविदास पेशवे यांचे निधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ज्येष्ठ चित्रकार देविदास पेशवे (वय ६० वर्षे) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन कन्या असा परिवार आहे. पेशवे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

पेशवे मूळचे बारामतीचे. येथील अभिनव महाविद्यालयात ते प्रशिक्षक होते. ‘केसरी’त त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांनी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे साकारली आहेत. दैनिके, साप्ताहिकांतही त्यांनी चित्रे काढली आहेत. वृत्तपत्र पुरवण्यांची सजावट हा त्यांचा आवडीचा विषय होता.

चित्रांविषयींचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. जीव ओतून चित्रे रेखाटणे हा त्यांचा महत्त्वाचा गुण होता. शांत स्वभाव आणि कार्यशैलीमुळे ते अनेक प्रकाशन संस्थांशी जोडले गेले होते. पेशवे उत्तम चित्रकार होते. तसेच ते भाषा, संस्कृती व पुराणाचे अभ्यासक, होते. पुण्यातील महत्त्वाच्या प्रकाशन संस्थांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे पेशवे यांनीच साकारली आहेत.

loading image
go to top