
पारगाव : अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील पुणे जिल्हा परिषदेचा पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी –१ मध्ये गेली सहा महीन्यापासून डॉक्टर नसल्याने पशु वैद्यकीय सेवा ठप्प झाली आहे. दुधाळ तसेच पाळीव जनावरांना वेळेवर उपचार नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. या ठिकाणी असलेले तालुक्यातील एकमेव जनावरांचे एक्सरे मशीन डॉक्टर अभावी बंद पडले आहे.