

पशुपालकांना तातडीची सुविधा द्या,
अधिकाऱ्यांना भेटी बंधनकारक करा
रयत क्रांती संघटनेची जिल्हा परिषदेकडे धाव
सोलापूर, ता. २८ ः जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाकडून ग्रामीण भागात अपेक्षित दर्जाच्या पशुवैद्यकीय सेवा मिळत नसल्याचा आरोप करत रायत क्रांती संघटनेने कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांना निवेदन सादर केले आहे. पशुपालकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध होत नाहीत. तसेच गावभेटींचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने जनावरांना आजार झाल्यास तत्काळ उपचार मिळत नाहीत. काही वेळा उपचाराअभावी जनावरांच्या मृत्यूचाही धोका निर्माण होतो. सरकारी यंत्रणेकडून त्वरित प्रतिसाद मिळत नसल्याने पशुपालकांना खासगी डॉक्टरांवर अवलंबून राहावे लागत आहे. यावेळी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, अनिकेत वेदपाठक, रमेश भांगे आदी उपस्थित होते.
संघटनेच्या प्रमुख मागण्या...
प्रत्येक गावात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियमित भेटी सुनिश्चित कराव्यात.
आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ सेवा मिळण्यासाठी हेल्पलाईन अथवा तत्पर यंत्रणा सुरू करावी.
सर्व सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यांत डॉक्टरांची नियमित उपस्थिती बंधनकारक करावी.
गावागावांत लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिरे नियमित आयोजित करावीत.
संबंधित अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवून जबाबदारी निश्चित करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.