शिक्षणाला मनोरंजनाची साथ हवी : डॉ. भूषण पटवर्धन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vice Chairman of the University Grants Commission, Dr. Bhushan Patwardhan said, In order to give scope to creativity in education, it should be accompanied by entertainment values

डॉ. पटवर्धन म्हणाले, इंग्रजांच्या काळापासून शिक्षणाकडे केवळ नोकरदार घडविण्याचा कारखाना या मानसिकतेने पाहिले जाते. तसेच पश्‍चिमेकडून येईल तेच सर्वोत्तम असा आपला समज आहे. कोरोनामुळे आपण अंतर्मुख झाले असून, समस्यांचे देशातच समाधान शोधायला लागलो आहे.

शिक्षणाला मनोरंजनाची साथ हवी : डॉ. भूषण पटवर्धन

sakal_logo
By
सम्राट कदम

पुणे :  शिक्षण केवळ पाठ्यपुस्तके आणि वर्गापुरते मर्यादित न राहता सर्वव्यापी झाले पाहिजे. शिक्षणातील सृजनशिलतेला वाव मिळण्यासाठी त्याला मनोरंजन मुल्यांची साथ मिळायला हवी, असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इ-कंटेंट डेव्हलपमेंट अँड लर्निंग इनोव्हेशन सेंटरतर्फे 'कंटेन्ट डिलिव्हरी एक्‍स्प्रेस'चे (सीडीएक्‍स) उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रकुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, सेंटरच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर आदी उपस्थित होते.

मनोरंजनात समाजपरिवर्तनाची ताकद असल्याचे सांगत डॉ. पटवर्धन यांनी शिकविण्याच्या पद्धतीत मनोरंजनातील मूल्यांचा वापर करण्याची सूचना केली. सीडीएक्‍सच्या उपलब्धतेबद्दल बोलताना ते म्हणाले, 'कोरोनाच्या आधी आपण फक्त शिक्षणातील तंत्रज्ञानाची चर्चा करत होतो. आता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी लागत असून, ई कंटेन्ट डेव्हलपमेंटचे व्यासपीठ असलेले सीडीएक्‍स शिक्षण क्षेत्रात भविष्यात क्रांती आणेल.' 

काय आहे सीडीएक्‍स? 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न शहरी आणि ग्रामीण महाविद्यालयांत स्टुडिओ उभारण्यात आले असून, त्याद्वारे विविध विषयांतील तासांचे रेकॉर्डिंग करण्यात येते. हे संपूर्ण तास विद्यार्थ्यांना सीडीएक्‍सच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. सुरवातीला दहा महाविद्यालयापासून सुरू झालेला हा प्रयोग आता 100 महाविद्यालयापर्यंत पोहचत आहे. तासीकेत विद्यार्थ्यांची रुची वाढावी म्हणून ग्राफिक्‍स, ऍनिमेशन, व्हिडिओ आदींचा वापर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला त्याच्या सोईनुसार आणि कितीही वेळा संबंधित तासिका पाहणे, गृहपाठ करणे शक्‍य होत आहे. 

पिंपरी चिचंवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

डॉ. पटवर्धन म्हणाले, इंग्रजांच्या काळापासून शिक्षणाकडे केवळ नोकरदार घडविण्याचा कारखाना या मानसिकतेने पाहिले जाते. तसेच पश्‍चिमेकडून येईल तेच सर्वोत्तम असा आपला समज आहे. कोरोनामुळे आपण अंतर्मुख झाले असून, समस्यांचे देशातच समाधान शोधायला लागलो आहे. पर्यायाने आपल्या संस्कृतीतील शिक्षा पद्धती, वैज्ञानिक आणि विद्यार्थीकेंद्रीत दृष्टीकोणाकडे आपण पुन्हा एकदा वाटचाल करत आहोत. यामुळे शिक्षण एककल्ली न राहता विविधांगी आणि संधी निर्माण करणारे होत आहे. 

शिक्षण केवळ शिक्षकांचा एकाधिकार असल्याची भावना नको. शिकण्याची प्रक्रिया विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांकडून व्हायला हवी. शिक्षकांनाही त्यांची भूमिका अधिक प्रगल्भ करावी लागेल. इथून पुढच्या काळात विद्यार्थी हा शिक्षणाच्या केंद्रस्थानी हवा. नवीन शैक्षणिक धोरणात हे अधोरेखित करण्यात आले आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, लॉकडाउनच्या काळात अल्पावधीतच आपण इकंटेन्ट विकसित करण्याची ही सुविधा महाविद्यालयांना उपलब्ध केली. साथीच्या काळात विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून दूर जाऊ नये म्हणून हा प्रयत्न होता. इतर विद्यापीठांनीही इकंटेन्ट विकसित करण्यासाठी पुढे यावे. 


संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top