Video : पुण्यात 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील नारेबाजीनं खळबळ

पीएफआय संघटनेविरोधातील कारवाईविरोधात आंदोलन करताना हा प्रकार घडला आहे.
Pune News
Pune News

पुणे : राष्ट्रीय तपास एजन्सीनं (NIA) पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात काल पुण्यात आंदोलन केलं. यावेळी 'पाकिस्तान जिंदाबाद' आणि 'अल्लाह हूं अकबर' अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. (Video announcement of Pakistan Zindabad in Pune sloganeering outside collector office)

जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर आंदोलन करणाऱ्या PFIच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. ताब्यात घेतल्यानंतर काही आंदोलनकांनी 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांनी मात्र या घटनेवर मौन बाळगलं आहे. पोलिसांकडून या व्हिडिओबाबत आणि त्यात देण्यात आलेल्या घोषणाबाजीबाबत अद्याप कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. पण याप्रकरणी पीएफआयचा कार्यकर्ता रियाज सय्यद याच्यासह ६० ते ७० इतर कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अनधिकृतरित्या निषेध आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे.

Pune News
Ira-Nupur Shikhare: आमिरची लेक होणार पुण्याची सून! जावईबापू पुण्याचा 'जीमकरी'

या घटनेसंदर्भात भाजपच्या नेत्यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. आमदार राम सातपुते यांनी पुणे पोलीस, राज्याचे पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलं की, "पुण्यात PFI च्या देशद्रोही लोकांच्या अटकेनंतर निघालेल्या मोर्चात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या पिलावळीला पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल करावेत. देशद्रोही जिहादी प्रवृत्तीची गय करता कामा नये"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com