Video : पुण्यात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनला आग; कारण अस्पष्ट

School van
School van

पुणे - पुण्यातील वारजे परिसरात शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व्हॅनला आग लागल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने व्हॅनमध्ये विद्यार्थी नव्हते. वारजे परिसरात असणाऱ्या कावेरी हॉटेल शेजारील लेनमधून स्कूल व्हॅन (एमएच १२ एचबी १३४) जात असताना व्हॅनच्या इंजिनने पेट घेतला. (Pune news in Marathi)

School van
Nasal vaccine : नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला सरकारची मान्यता; आजपासून लसीकरणाला सुरुवात

आग लागण्याचे कारण समजले नसले तरी वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने सदरील घटना घडली असावी असा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी वर्तवला आहे. दरम्यान स्थानिक नागरिकांनी जवळील हॉटेलच्या किचन मधील पाणी घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

हेही वाचा Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com