पुण्यात झाड पडतानाचा व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

वादळी वारे, गारपिटीसह मुसळधार पावसाने बुधवारी संध्याकाळी पुण्याला अक्षरशः झोडपले. यंदाच्या पावसाळ्यात अशी परिस्थिती निर्माण होण्याची ही तिसरी वेळ. यापूर्वी, २५ सप्टेंबर व चार ऑक्‍टोबर या दिवशी पुणे बंद पडण्याची स्थिती निर्माण झाली होती.

पुणे - वादळी वारे, गारपिटीसह मुसळधार पावसाने बुधवारी संध्याकाळी पुण्याला अक्षरशः झोडपले. यंदाच्या पावसाळ्यात अशी परिस्थिती निर्माण होण्याची ही तिसरी वेळ. यापूर्वी, २५ सप्टेंबर व चार ऑक्‍टोबर या दिवशी पुणे बंद पडण्याची स्थिती निर्माण झाली होती.

पावसामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठा, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता, सिंहगड, सातारा, कर्वे रस्त्यासह प्रमुख रस्ते या भागात प्रवास करणाऱ्या आणि राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्तापाला तोंड द्यावे लागले.  वादळी पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिकांची तारंबळ उडाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video of a tree falling in Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: