Vidhan Sabha 2019 : विधानसभेची पुण्यातील पहिली उमेदवारी जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात एमआयएमने आघाडी घेतली आहे. त्यानुसार पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातून डॅनिअल लांडगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. लांडगे हे आगामी विधानसभा निवडणुकीतील पुणे शहरातील पहिले अधिकृत उमेदवार ठरले आहेत. 

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात एमआयएमने आघाडी घेतली आहे. त्यानुसार पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातून डॅनिअल लांडगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. लांडगे हे आगामी विधानसभा निवडणुकीतील पुणे शहरातील पहिले अधिकृत उमेदवार ठरले आहेत. 

डॅनिअल लांडगे हे पुणे महापालिकेतील एमआयएमच्या एकमेव नगरसेविका अश्‍विनी लांडगे यांचे पती आहेत. या उमेदवारीच्या माध्यमातून एमआयएमने पुण्यातील मुस्लिम, दलित आणि ख्रिश्‍चन मतांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा येरवडा परिसरातील सामाजिक कार्यात मोठा सहभाग असून पत्नी नगरसेविका असल्याने त्याचाही फायदा त्यांना होणार आहे. 

वंचित बहुजन आघाडीसोबत काडीमोड घेतल्यानंतर एमआयएमने राज्यातील विधानसभा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी मंगळवारी एमआयएमच्या राज्यातील चार उमेदवारांची यादी जाहीर केली. या पक्षाची उमेदवारी जाहीर झालेल्यांमध्ये लांडगे यांच्यासह मोहंमद फिरोज लाला (नांदेड उत्तर), मुफ्ती महंमद इस्माईल अब्दुल खालिक (मालेगाव मध्य) आदींसह चार जणांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 first candidate to be declared from pune