Vidhan sabha 2019 : सदानंद शेट्टींच्या प्रवेशाने कॅन्टोन्मेंटमध्ये ताकद वाढली : मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

पुणे : पुण्यातील महत्वाचा समजला जाणारा पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघ पुण्यातील ८ मतदार संघांपैकी हा मतरदारसंघ काँग्रेससाठी विजयरथ खेचून आणेल अशी अशा असतानाच सोमवार रात्री काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला आहे. तो म्हणजे पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच माजी नगरसेवक सदानंद शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये काल(गुरुवारी) रात्री साडे नऊच्या सुमारास लोहगाव विमानतळावर भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

Vidhan Sabha 2019 : पुणे : पुण्यातील महत्वाचा समजला जाणारा पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघ पुण्यातील ८ मतदार संघांपैकी हा मतरदारसंघ काँग्रेससाठी विजयरथ खेचून आणेल अशी अशा असतानाच सोमवार रात्री काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला आहे. तो म्हणजे पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच माजी नगरसेवक सदानंद शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये काल(गुरुवारी) रात्री साडे नऊच्या सुमारास लोहगाव विमानतळावर भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, खासदार संजय काकडे, माजी नगरसेवक गणेश बिडकर, साक्षात शेट्टी अशा दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''सदानंद शेट्टी यांचे मंगळवार पेठेतील व परिसरातील सामाजिक कार्य वाखणण्याजोगे आहे. त्यांनी उभा केलेला एस. आर. ये प्रोजेट, निकाली काढलेला पाण्याचा प्रश्न, या भागातील  मूलभूत प्रश्न मार्गी लावले असून त्यांनी त्यांच्या राजकीय असलेल्या ३७ वर्षाच्या कारकिर्दीत केलेले कामे कौतुकास्पद असून थक्क करणारी आहेत. आताच्या कॅन्टोन्मेंट विधानसभा निवडणुकीची जबाबदारी आम्ही त्यांना दिली असून ते कॅन्टोन्मेंटचा विजय खेचून आणतील, यात तिळमात्र आम्हाला शंका नाही.

चंद्रकात पाटील म्हणाले, ''शेट्टीं यांच्या प्रवेशामुळे आमची मोठ्या प्रमाणात कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात ताकद वाढली असून सच्चे आणि इमानदार शेट्टी यांच्यासोबत आम्ही सदैव असू. संजय काकडे म्हणाले की, शेट्टी यांच्या प्रवेशाने कॅन्टोन्मेंट मतदार संघामध्ये भाजप शिवसेना युतीचे उमेदवार सुनील कांबळे यांना फायदा होईल.

यावेळी सदानंद शेट्टी म्हणाले की,''सोमवारी सकाळीच मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रतिनिधी, पुणे शहराचे काँग्रेस पक्ष उपाध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुपूर्द केला होता.'' शेट्टी पुढे म्हणाले की, ''मी काँग्रेस पक्षात गेल्या 3 दशकापासून कार्यरत असून काँग्रेसने येणं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या निष्ठेची, विष्ठा केली. प्रामाणिकपणे काम करू देखील अशी दुटप्पी भूमिका काँग्रेसने घेतली त्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. भाजपमध्ये राहून मला अजून समाजहितासाठी कामे करायची आहेत आणि मी ती निष्ठेने करीन. आज खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच गणेश बीडकर यांच्या साथीने मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

शेट्टी यांनी कॅन्टोन्मेंट मतदार संघातून उमेदवारी मागितली होती मात्र, पक्षाने शहर अध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे यांना उमेदवारी दिली. बंडखोरी करत अर्ज दाखल करणाऱ्या शेट्टी यांनी अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतला होता. परंतु यानंतर ते पक्षात अस्वस्थ होते. अखेर त्यांनी संजय काकडे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, शेट्टी यांच्या भाजपमध्ये येण्याने कॅन्टोन्मेंटमध्ये भाजपची ताकत वाढली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Sadanand Shetty entry in BJP strengthen to the pune cantonment said CM devendra Fadnavis