Vidhan Sabha 2019 : संभाजी ब्रिगेडचा गनिमीकावा फसला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात संभाजी  ब्रिगेडने मोठा मासा गळाला लावण्याचा प्रयत्न केला. हा बडा नेता आज अर्ज ही भरणार होता, पण मुदत संपण्याच्या दोन तास आधी या इच्छुकांने बंडखोरी करण्यास नकार दिल्याने संभाजी ब्रिगेडचा गनिमीकावा फसला. 

पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात संभाजी  ब्रिगेडने मोठा मासा गळाला लावण्याचा प्रयत्न केला. हा बडा नेता आज अर्ज ही भरणार होता, पण मुदत संपण्याच्या दोन तास आधी या इच्छुकांने बंडखोरी करण्यास नकार दिल्याने संभाजी ब्रिगेडचा गनिमीकावा फसला. 

काँगेसचे खडकीतील मोठे प्रस्थ असलेले मनिष आनंद हे काँग्रेसकडून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास तीव्र इच्छुक होते, त्यांना दोन वर्षांपासून तयारीही सुरू केली होती. पण पक्षाने त्यांना डावलून दत्ता बहिरट यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आनंद हे नाराज असून, ते बहिरट यांचा अर्ज भरतानाही उपस्थित नव्हते. 

आनंद हे नाराज असल्याने संभाजी ब्रिगेडने आनंद यांच्याशी संपर्क साधत, शिवाजीनगर मधून अर्ज भरण्याची गळ घातली होती. गुरूवारी रात्री आनंद यांनी बंडखोरी करण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे शिवाजीनगर मध्ये खळबळ माजणार असा मेसेज ब्रिगेडच्या पदाधिकार्यांनी व्हायरल केला होता. 

शुक्रवारी अर्ज भरण्यासाठीचा शेवटचा दिवस असताना मुदत संपायच्या दोन तास आधी आनंद यांनी निवडणूक लढवणार कळवले, असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांना असे सांगितले. मनिष आनंद यांनी ही यास दुजोरा देत मी पक्षाच्या विरोधात न जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha Manish Anand did not filed in the nomination form