वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू

Vanchit-bahujan-Aghadi
Vanchit-bahujan-Aghadi

पुणे - वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आज (ता. ३) आणि उद्या (ता. ४) जुने शासकीय विश्रामगृह येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. आतापर्यंत मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश येथील अकराशे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. 

पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातील उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी या मुलाखती घेण्यात येत असल्याची माहिती ॲड. अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. अशोक सोनोणे, रेखा ठाकूर आणि किसन चव्हाण उपस्थित होते. ॲड. पाटील म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेससोबत आघाडी व्हावी, यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, आम्हाला चार महिने उत्तर मिळाले नाही. या निवडणुकीदरम्यान काँग्रेसने वंचित बहुजन आघाडी विरोधात चुकीचा प्रचार केला. याचा फटका पक्षाला बसला असून, जोपर्यंत काँग्रेस याचा खुलासा करणार नाही, तोपर्यंत आघाडीशी कोणतीही बोलणी करणार नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com