CM Eknath Shinde: कोणावरही टीका-टिप्पणी न करता बारामतीतील नमो महारोजगार मेळावा पडला पार

Vidya Pratishthan Baramati: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बारामती शहर राज्यासाठी विकासाचं मॉडेल ठरेल. बारामतीमध्ये पोलिसांना चांगल्या सोईसुविधा देण्यात आल्या आहेत
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeESAKAL

पुणे- बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या संस्थेमध्ये नमो महारोजगाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बारामती शहर राज्यासाठी विकासाचं मॉडेल ठरेल. बारामतीमध्ये पोलिसांना चांगल्या सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. आमचं सरकार लोकाभिमूख सरकार आहे. विकासाच्या कामात आमचं सरकार राजकारण आणत नाही हे आज स्पष्ट झालं आहे.

राज्यात अशाच प्रकारचे मेळावे घेण्यात येतील. सर्वसमावेशकतेचं राजकारण आपल्याला करायचं आहे. ७५ हजारांपेक्षा जास्त रोजगारनिर्मिती झाली आहे. त्यात आणखी वाढ होत आहे. बारामतीमध्ये २५ हजार जणांना रोजगार दिला जात आहे. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण ठेवण्यात येणार आहे, असं शिंदे म्हणाले आहेत. (vidya pratishthan baramati cm eknath shinde speech)

CM Eknath Shinde
Ajit Pawar in Namo Rojgar Melava : पूर्वीची बारामती अन् आज.. शरद पवारांच्या समोरच अजित पवारांनी मोजली विकासकामे

बारामती झालेल्या नवीन इमारती या दर्जेदार आहेत. पोलिसांच्या नवीन इमारती दर्जेदार आहेत. पोलीस कधी ही पाहिलं तर उन, वारा, पावसामध्ये ते बाहेर असतात. आजच्या मंचावर पवार साहेब पण आहेत आणि अजित दादा सुद्धा आहेत. विकास कामात आम्ही राजकारण अणू इच्छित नाहीत. हे पहिलं सरकार असेल की सेलिक्शेन झालं की अपॉइंटमेंट द्यायला लगेच तयार आहे, असं शिंदे म्हणाले.

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला लाभ मिळत आहे. सर्वांना एकाच छताखाली सर्व सुविधा मिळत आहेत. २ कोटी ६० लाख लोकांना याचा लाभ मिळाला आहे. राज्याचं भवितव्य घडवण्याची तरुणांना संधी आहे. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये स्कील डेव्हलपमेंटला महत्त्व देण्यात आलं आहे, असं शिंदे म्हणाले.

बारामतीमध्ये असलेल्या नमो महारोजगार मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. कारण, व्यासपीठावर शरद पवार, अजित पवार, मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे हे एकत्र आले होते. त्यामुळे व्यासपीठावरुन टीका-टीप्पणी होण्याची शक्यता होती. पण, कोणत्याही टिका-टिप्पणीशिवाय हा कार्यक्रम पार पडला आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com