
बारामती, ता. 2- लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. 2) बारामतीत झालेला कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात व राजकीय टीकाटीपण्णी न होता पार पडला. सर्वच नेत्यांनी दाखविलेली राजकीय प्रगल्भता हा बारामतीत आज चर्चेचा विषय होता.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लंच डिप्लोमसीचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना धाडलेले पत्र, पवारांचे निमंत्रणपत्रिकेवर नाव नसणे व पुन्हा त्यांना निमंत्रणपत्रिकेवर सन्मानाचे स्थान देणे, व्यासपीठावर शरद पवार यांचा राज्य शासनाने सन्मान ठेवणे या सर्व पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाकडे सर्वांचेच लक्ष होते.
प्रत्यक्षात राजकारणविरहीत असाच हा कार्यक्रम झाला. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणविरहीत हा उपक्रम असल्याचा केलेला उल्लेख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या उपक्रमासाठी सरकारची केलेली प्रशंसा व अशा कामात कायम साथ देण्याची ग्वाही या मुळे हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर गेला.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत येणार म्हटल्यावर राजकीय फटकेबाजी होईल अशी अपेक्षा होती, प्रत्यक्षात विद्यार्थी व रोजगारप्राप्त उमेदवार समोर असल्याने सर्वांनीच राजकीय टीपण्णी टाळली.
बारामतीतील पोलिस दलाच्या सुसज्ज इमारतींवर खूष झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात राज्यातील सर्वच पोलिस दलाच्या इमारती अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने बांधू असे सांगितले, ते हळूच म्हणतील मग गृहखातेही मलाच देऊन टाका....पण असे होणार नाही, खाते मिळणार नाही अशी गंमतीदार कोटीही फडणवीस यांनी केली. बारामतीची सरकारी कार्यालयांना कार्पोरेट लूक असल्याची पावती देत सरकारी कार्यालय चांगलीच असावीत असे नमूद केले.
बारामतीच्या विकासासाठी हात आखडता घेणार नाही अशी ग्वाही देतानाच व्यासपीठावर उपस्थित अर्थमंत्री अजित पवारांना बघून शिंदे म्हणाले, तिजोरीची चावी तुमच्याकडेच आहे, त्या मुळे काही अडचणच नाही, यावर अजित पवारांनाही स्मित हास्य केले.
ज्येष्ठ नेते शरद पवार व्यासपीठावर येताच युवकांनी जोरदार जल्लोष केला. त्यांनी हात उंचावून अभिवादन केल्यानंतर आणि ते भाषणाला उभे राहिल्यानंतर उपस्थित युवकांनी जोरदार जल्लोष करत त्यांच्या प्रती असलेला स्नेहभाव व्यक्त केला.
पुणे ग्रामीण पोलिस दलाला आज दिलेल्या 39 वाहनांपैकी 14 वाहनांवर महिला चालक असल्याची माहिती अजित पवार देत, त्या अधिक कार्यक्षमपणे वाहन चालवतात, अशी पावतीही त्यांनी दिली. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.