

Vidya Valley's 'Dream Team' Scales Africa’s Highest Peak
Sakal
पुणे : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील विद्या व्हॅली स्कूलच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षक-पालकांनी आणि ट्रेकर्सनी आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेल्या माउंट किलीमांजारोवरील उहुरू पीक (५,८९५ मीटर) यशस्वीरीत्या सर करून इतिहास घडवला. पुण्यातील अनुभवी गिर्यारोहक आणि विद्या व्हॅली स्कूलचे क्रीडा शिक्षक दिनेश कोतकर यांच्या नेतृत्वाखालील सात सदस्यीय पथकाने ही थरारक आणि प्रेरणादायी मोहीम पूर्ण केली.