vidyadhar anaskar
sakal
पुणे - देशातील राज्य सहकारी बँकांचे राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या 'नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक्स लिमिटेड' (नॅफ्स्कॉब) या संस्थेच्या संचालक मंडळावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक आणि ज्येष्ठ सहकार व बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे राष्ट्रीय सहकारी बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.