विद्याधर अनास्कर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा

सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड
विद्याधर अनास्कर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा
विद्याधर अनास्कर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जाsakal
Updated on

पुणे : बँकिंग तज्ज्ञ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे (Maharashtra State Cooperative Bank) प्रशासक विद्याधर अनास्कर यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नेमणूक करून अनास्कर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. या परिषदेचा कार्यकाल सहा ऑगस्ट २०२१ पासून तीन वर्षे अथवा पुढील आदेश होईपर्यंत राहील. (Vidyadhar Anaskar is the post minister minister of state)

अनास्कर हे उच्चशिक्षित असून, गेल्या ३० वर्षांपासून राज्याच्या सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. ते सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर प्रशासक, नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन बँक्सचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. पुण्यातील विद्या सहकारी बँकेचे ते कार्यवाहक संचालक, रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांसाठी स्थापन केलेल्या महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि जम्मू-काश्मीर राज्याचे सदस्य आहेत. रिझर्व्ह बँकेच्या सल्लागार समितीचे ते गेल्या १२ वर्षांपासून सदस्य आहेत.

विद्याधर अनास्कर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा
Sakal Impact : खड्डे बुजविण्यासाठी प्रशासन लागले कामाला

राज्य सरकारने ९७ व्या घटना दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर स्थापन केलेल्या कायदा दुरुस्ती समितीचे ते उपाध्यक्ष होते. पुणे जिल्हा बँक्स असोसिएशनचे ते संचालक आहेत. तसेच, अनास्कर यांनी वृत्तपत्रांमधून बँकिंगविषयी विपुल लेखन केले आहे. बँकिंग विषयावर त्यांची आजपर्यंत आठ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ‘बँकिंग साक्षरता प्रतिष्ठान’च्या माध्यमातून सामान्य जनतेला बँकिंगविषयक मोफत सल्ला देण्याचे कार्य करीत आहेत. त्यांची महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. सहकार क्षेत्रामध्ये सेवाभावी वृत्तीने केलेल्या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने मेरीटच्या आधारे नेमणूक केल्याबद्दल सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

विद्याधर अनास्कर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा
राज्यात 14 संवर्धन राखीव क्षेत्र अभयारण्य होणार? उपसमिती करणार पडताळणी

विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : अनास्कर

‘माझी जात सहकार, माझा धर्म सहकार आणि माझी विचारसरणीही सहकारच’ या वृत्तीने सहकारात प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची दखल राज्य सरकारने घेत सहकारातील या सर्वोच्च पदावर नेमणूक केली आहे. त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्या मातेने मला घडविले, चांगले संस्कार दिले, ती आज हयात असती तर तिचा आनंद द्विगुणित झाला असता. ज्या ‘लिज्जत पापड’ संस्थेने लहानपणीच सहकाराचे महत्त्व पटवून दिले. उद्यम बँकेने मला संधी दिली आणि विद्या बॅंकेने माझ्या पंखात बळ दिले. या संस्थांचा आणि माझ्या वाटचालीत मोलाचे मार्गदर्शन, पाठिंबा दिला त्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. राज्य बँकेचे अध्यक्ष म्हणून युती सरकारच्या काळात झालेली माझी नेमणूक महाविकास आघाडी सरकारने कायम ठेवली, हीच माझ्या कामाची खरी पावती आहे. हेच मला मिळालेले सर्वात मोठे प्रशस्तीपत्र आहे, असे मी मानतो, अशी प्रतिक्रिया अनास्कर यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com